भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह संशयीत जाळ्यात
गुन्हा करण्यापूर्वीच भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ (3 मार्च 2025) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी हनुमान नगराकडे जाणार्या साईबाबा मंदिराजवळील टी.व्ही.ग्राउंडवर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी हिरामण उर्फ किशोर सकरु जाधव उर्फ गोजोर्या (32, वाल्मीक नगर, भुसावळ) यास गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह पकडले. ही कारवाई शनिवार, 1 रोजी रात्री सव्वा नऊ वाजता करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिसांना संशयीत गोजोर्या हा काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाव घेतली. संशयीताकडील 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार महेश चौधरी, प्रशांत परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अमर आढळे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा, पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.




