राज्यातील लाडक्या बहिणींची चिंता मिटली : फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार !


The worries of the beloved sisters of the state have been resolved. मुंबई (3 मार्च 2025) : राज्यातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसल्याने त्यांना हप्ता कधी मिळणार? याबाबत उत्सुकता लागली होती मात्र राज्य शासनाकडून जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यास सुरुवात केली होती मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने, तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.


लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे. दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी 1500 या प्रमाणे 3 हजार रुपयांची रक्कम 8 मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनादिवशी या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !