भुसावळ शहरातील 28 वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार
भुसावळ (4 मार्च 2025) : भुसावळ शहरातील ब्युटी पार्लर चालक 28 वर्षीय तरुणीशी लग्न करण्याचे आश्वासन देत वेळोवेळी अत्याचार करण्यात आला मात्र लग्न न करता पीडीतेची फसवणूक करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून संशयीत खालीद शाहा सलीम शाहा (दीनदयाल नगर, भुसावळ) विरोधात सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जीवे ठार मारण्याची धमकी
भुसावळ शहरातील एका भागात 28 वर्षीय तरुणी वास्तव्याला असून ती ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. 15 मे 2023 ते 1 एप्रिल 2024 दरम्यान तरुणीची खालीद शाहा सलीम शाहा (रा.जामनेर रोड, भुसावळ) याच्याशी ओळख झाल्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला व पीडीतेसोबत भांडण करीत तुझ्या पाठीमागे कुणीही नाही, तुला जे करायचे ते कर, तुझे तुकडे तुकडे करेल, अशी धमकी दिली.

पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिल्यावरून आरोपीविरोधात सोमवारी रात्री 11 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.




