भरधाव कंटेनरच्या धडकेने मुक्ताईनगरात दुचाकीस्वार ठार


Biker killed in Muktainagar after being hit by speeding container मुक्ताईनगर (5 मार्च 2025) : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात मुक्ताईनगर रोडवरील फ्लोरा हॉटेलजवळ मंगळवार, 4 रोजी सकाळी आठ वाजता घडला. हरी वाघ (64, टहाकळी, ता.भुसावळ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हरी वाघ हे दुचाकी (एम.एच.19 सी.डी.7498) वरून जात असताना फ्लोरा हॉटेलजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनर (एम.एच.18 बी.जी.6769) वरील चालक वाहिद खान शेरू खान (34, शिरपूर) याने जोरदार धडक दिल्याने वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. अपघातानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी धाव घेतली. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी संजय मन्साराम वाघ (47, टहाकळी) यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बोदडे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !