भुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेने बीडगावचा तरुण ठार
भुसावळ (5 मार्च 2025) : अज्ञात वाहनाने रस्त्याने पायी चालणार्या तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबनजवळ मंगळवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्तनसिंग उर्फ अर्जुन जारसिंग बारेला (35, चांदण्यातला, बीडगाव, ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.
मृताचा भाऊ दिलीप जारसिंग बारेला (40, चांदण्यातला, बीडगाव) याने भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ वर्तनसिंग हा मंगळवार, 4 मार्च रोजी रात्री 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मधुबन हॉटेलसमोर मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात वर्तनसिंगचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. तपास सहा.पोलीस निरीक्षक गणेश धूमाळ करीत आहेत.





