भुसावळ शहर व तालुक्यातून दोन अल्पवयीन तरुणींना पळवले
भुसावळ (7 मार्च 2025) भुसावळ शहरातील जामनेर रोडसह तालुक्यातील फेकरी गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसासह भुसावळ तालुका पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयीतांविरोधात गुन्हा
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील 17 वर्ष 10 महिने वयाची अल्पवयीन कुटूंबासह वास्तव्यास आहे. सोमवार, 3 मार्च रोजी रात्री दोन ते चार दरम्यान जामनेर रोडवरील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवत पालकांच्या ताब्यातून पळवून नेले. 40 वर्षीय पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.
दुसर्या घटनेत भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील 13 वर्ष सात महिने वयाच्या अल्पवयीनाला संशयीत पवन तायडे-कोळी याने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. अल्पवयीन मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.




