बोदवडला ग्राम महसूल अधिकार्याला मारहाण
बोदवड (8 मार्च 2025) : ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात तक्रार अर्जावरून नावात दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या संशयीताने ग्राम महसूल अधिकार्याला मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा आणण्यात आला. मंगळवार, 4 रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी जयेश जगदीश सुरवाडे (27, बोदवड) यांच्या फिर्यादीवरून राहुल प्रभाकर वाघ (बोदवड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरवाडे यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी निलेश ईश्वरेसोबत आलेला राहुल प्रभाकर वाघ याने शासकीय कार्यालयात शिविगाळ केली तसेच उजव्या हाताने डाव्या गालावर मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला. तपास हवालदार अयुब तडवी करीत आहेत.





