जामखेड तालुका हादरला : दोघा मित्रांची निर्जनस्थळी एकाचवेळी आत्महत्या
अहिल्यानगर (12 एप्रिल 2025) : दोन मित्रांनी निर्जनस्थळी जाऊन एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. दोन्ही मित्र दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथून पिंपरी चिंचवडला गेले होते. शनिवारी दुपारी त्यांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यापैकी एक जण विवाहित तर दुसरा अविवाहित होता. या दोघांच्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. तुषार ढगे (25) व सिकंदर शेख (30) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेनंतर जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे शोककळा पसरली आहे. दोघांचेही नातेवाईक पिंपळगाव उंडा येथून घटनास्थळी पोहचले. पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली जात आहे. दोघा मित्रांनी आत्महत्या नेमकी का केली याचे कारण शोधलं जात असून आत्महत्या केलेल्यांपैकी तुषार ढगे हा अविवाहित होता. तर दुसरा मित्र सिकंदर शेख याचे लग्न झाले आहे.

गुरुवारी दोघे मित्र पिंपळगाव उंडा येथून पुण्यातील पिंपरी चिंचवडला गेले होते. मोर्शी येथील भारत माता चौकात ते गेले होते. शनिवारी त्या दोघांचे मृतदेह एकाच वेळी एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेत.




