भोरगाव लेवा आयडॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

46 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आमदार जावळे यांची उपस्थिती


Spontaneous response to Bhorgaon Leva Idol competition भुसावळ (16 एप्रिल 2025) : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे महिला मंडळ विभाग, भुसावळ यांच्या वतीने भोरगाव लेवा आयडॉल (गायन स्पर्धा) शहरातील प्रभाकर हॉलमध्ये झाली. या स्पर्धेत एकूण 46 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये बाल गट, पुरूष सोलो, महिला सोलो आणि ड्युएट या प्रत्येक गटातून तीन विजेते घोषित करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल हरिभाऊ जावळे, डॉ.केतकी उल्हास पाटील उपस्थित होेत्या. सूत्रसंचालन वर्षा लोखंडे तर आभार डॉ.मृणाल पाटील यांनी मानले. यावेळी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे येथील सर्व सभासदही उपस्थित होते. कार्याध्यक्षा मृणाल पाटील यांनी भोरगाव महिला लेवा मंडळाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढेही अनेक समाजोपयोगी प्रकल्प करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले.


पाण्यावर शोषखड्ड्याचा उपाय
उपाध्यक्ष डॉ.संज्योत पाटील यांनी भुसावळच्या पाणी प्रश्नावर उपाय म्हणून शोषखड्डया विषयी माहिती दिली व पुढचा प्रोजेक्ट शोषखड्डा करणार असल्याचे जाहीर केले. भुसावळकरांसाठी हा अत्यंत फायदेशीर प्रोजेक्ट असून अनेकांनी नावनोंदणी त्यासाठी केली.

यांचे स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम
महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना महेश फालक, कार्याध्यक्ष डॉ.मृणाल चेतन पाटील, उपाध्यक्षा प्राची राणे, कोषाध्यक्ष मोना पंकज भंगाळे, सहकोषाध्यक्ष वैशाली किरण महाजन, दीपाली परीक्षीत बर्‍हाटे, डॉ.संज्योत पाटील, सचिव स्वाती चौधरी, सहसचिव किरण सुनील जावळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनात आरती चौधरी, मंगला पाटील, कावेरी चौधरी, संध्या वराडे, सुभाष भंगाळे व सुहास चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चेतन पाटील यांनी मदत केली. या कार्यक्रमासाठी भुसावळ परिसरात शिवाय अकोला, औरंगाबाद, मलकापूर, मुंबई येथूनही स्पर्धक उपस्थित होते.

असे आहेत विजेते
किशोर गट- ऐश्वर्या एस. पाटील, तनुश्री भोळे, राशी पाटील, योगेश राणे, मानस गोपाळ पाटील

पुरुष खुला गट- डॉ.अनंत बेंडाळे, गोपाळ पाटील, किशोर पाटील, दीपक धांडे, डॉ.दिनेश नेहेते

महिला खुला गट- किर्ती पाटील, डॉ.जान्हवी पाटील, डॉ.सुजाता खरचे, डॉ.छाया चौधरी, वर्षा पाटील, सीमा चौधरी

युगल गट- डॉ.जान्हवी पाटील व डॉ,अनंत बेंडाळे, नम्रता नेहेते व पूनम पाटील, डॉ.दिनेश नेहेते व डॉ.देवयानी नेहेते


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !