भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 4 रोजी आठवणीतले माहेर कार्यक्रम
गृहिणींसाठी विविध स्पर्धा : लकी ड्रा विजेत्या महिलांना मिळणार आकर्षक पैठणी
A memorable Maher program on the 4th by Pratishtha Mahila Mandal in Bhusawal भुसावळ (16 एप्रिल 2025) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील स्टार लॉनमध्ये अक्षयतृतीया सणाचे औचित्य साधून रविवार, 4 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता ‘आठवणीतले माहेर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शिवाय महिलांना कार्यक्रमस्थळी बैलगाडीद्वारे आणून त्यांचे विशेष स्वागत केले जाणार आहे. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या सखींना आकर्षक पैठणी दिली जाणार आहे.
अशा होणार स्पर्धा
सर्वोत्तम भारतीय नववधू (बेस्ट इंडिअन ब्राईडल) ः या स्पर्धेत सहभागी स्पर्धकाला देशातील कुठल्याही राज्यातील नववधूची वेशभूषा साकारता येणार आहे.

समूह नृत्य स्पर्धा (ग्रुप डान्स स्पर्धा) : ग्रुप डान्समध्ये किमान चार महिलांचा सहभाग आवश्यक असून स्पर्धेचा वेळ किमान चार ते पाच मिनिट असणार आहे. अक्षय तृतीया वा महाराष्ट्र दिनावर आधार नृत्य सादर करता येणार आहे.
वेशभूषा स्पर्धा : भारतातील महान स्त्रिया (ऐतीहासिक महान स्त्रिया किंवा आजच्या यशस्वी महान स्त्रिया) यांची वेषभूषा साकारता येणार आहे.
निबंध स्पर्धा : निबंध स्पर्धेसाठी महाराष्ट्रीय कुटूंबातील सण परंपरा, अक्षयतृतीया अक्षय राखण्यासाठी माझ्या दृष्टीने रचनात्मक उपाय, महाराष्ट्रीय स्त्री गीते आणि सण संबंध, आधुनिक काळातील माझ्या मनातील माहेर – अपेक्षा आणि कर्तव्ये, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी (प्रगती साठी) लाडक्या बहिणींचे योगदान आदी विषय आहेत. निबंध हे 2 मे पर्यंत व्हॉटसअॅप राजश्री देशमुख यांना मो.8888389793 या क्रमांकावर पाठवावेत शिवाय केवळ दिड ते दोन हजार शब्दांचा निबंध अपेक्षित आहे.
मेहंदी स्पर्धा : स्पर्धकांना मेहंदीचा कोन मंडळातर्फे देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी येथे साधा संपर्क
स्पर्धेत सहभागासाठी अनिता आंबेकर (07304434949, 09623037418), सोनल महाजन (9130838468), जयश्री चौधरी (9158823288), मनीषा काकडे (7387187060), वैशाली सैतवाल
(9511886655), राजश्री बादशाह (8600783976) या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच कार्यक्रमानंतर महिलांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी 2 मे पर्यंत नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
माहेरची आठवण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न : रजनी सावकारे
अक्षयतृतीयेला सासरवाशीन माहेरी येते व माहेरच्यांसोबत रमते, झोके खेळते, माहेरी आंब्याचा रस, पुरणाची पोळी, कुरडई-पापड यांचा मनसोक्त आस्वाद घेते मात्र बदलत्या जीवन शैलीमुळे हे चित्र आता दुर्मीळ होवू पाहता आहे मात्र प्रत्येक महिलेच्या मनातील माहेरची आठवण जिवंत राहून तिला माहेरची उणीव भासू नये म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘आठवणीतले माहेर’ या कार्यक्रमाचे आयोजन स्टार लॉनमध्ये करण्यात आल्याचे मंडळाच्या अध्यक्षा व आयोजक रजनी सावकारे यांनी सांगितले.
