धुळे नूतन जिल्हाधिकारीपदी संजय यादव
धुळे : नागपूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांची काही दिवसांपूर्वीच वसई विरार महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती मात्र धुळे जिल्हाधिकारीपदी कुणाचीही नेमणूक झालेली नव्ही. मंगळवारी शासनाने या संदर्भात आदेश काढले असून संजय यादव यांना तातडीने पदभार स्वीकारावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

