अजित पवारांसोबत जाणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट संकेत

राज्यभर दौरा करण्याची घोषणा : लडेंगे और जितेंगेची घोषणा


पुणे (10 जून 2025) : अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले असून यामुळे आगामी आगात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी एकमेकात मर्ज होण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा सुप्रिया यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ’लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही घोषणा किंवा संकेत देतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, सुळे यांनी आपण महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार असल्याचे सांगितले. तसेच स्वत:वर विश्वास ठेवला तर एक दिवस आपण नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि गेल्या 26 वर्षांची वाटचाल, ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने झालेली आहे. यासोबत संघर्ष हा येतच असतो मात्र त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आठ खासदारांची संसदेत दखल घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल घेतल्याशिवाय देशातील एकही महत्त्वाचा निर्णय पूर्ण होत नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !