धुळ्यातील कोरोनाबाधीत राजकीय व्यक्तीचा मृत्यू
भोलाबाजार परीसरात संतप्त जमावाने केली दगडफेक
धुळे : धुळ्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याशी संबंधित नातेवाईकाचा कोरोनामुळे मृल्यू झाल्याची गुरुवारी सकाळी घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या या इसमाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर या पदाधिकार्याशी संपर्कात आलेल्यांनाही कॉरंटाईन करण्यात आले होते मात्र त्यातच गुरुवारी सकाळी या कोरोनाबाधीत इसमाचा मृत्यू ओढवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी भोला बाजार परीसरात गर्दी करीत किरकोळ दगडफेक केल्याचे बोलले जात आहे.
एकाच दिवशी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकाच दिवशी सात नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात धुळे शहरातील सहा व शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 15वर पोहचली आहे.


