विरोदे येथे गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


Tractors transporting minor minerals seized in Virode यावल (15 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील विरोदे परिसरात बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने प्रभावी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले. बामणोद मंडळ अधिकारी दीपक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी विजय शिरसाठ, श्रीकांत केंद्रे, दिलीप केदारे, सुचिता देशभ्रदार,शैलेश झोटे, गजानन पाटील, संजय तडवी व कोतवाल प्रशांत सरोदे यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 सी. 2688) हे परवानगीशिवाय गौण खनिज (मुरूम/वाळू) वाहतूक करताना आढळून आले. ट्रॅक्टरचा मालक सुरेश जगन्नाथ सोनवण (रा.पिंपरूड) यांच्याविरुद्ध महसूल विभागाने नियमांनुसार कारवाई केली. जप्त केलेले ट्रॅक्टर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी फैजपूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !