छत्रपती संभाजीनगरात सर्वात मोठी कारवाई : अमेरिकींना दररोज लाखोंचा लाखांना गंडा घालणारे 120 जणांचे रॅकेट उद्ध्वस्त
छत्रपती संभाजीनगर (29 ऑक्टोबर 2025) : सायबर फसवणूक प्रकरणात राज्यातील सर्वात मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरात करण्यात आली. कॉल सेंटरमध्ये पडलेल्या धाडीत 96 तरुण आणि 24 तरुणींना अटक करण्यात आली. या
दररोज होत होती 50 लाखांची फसवणूक
शहरातील गरवारे स्टेडियमजवळील आयटी पार्कमध्ये सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाजता पोलिसांनी कंपाउंडवरून उड्या घेत कंपनीत छापा टाकला. तीन डीसीपींसह 190 पोलिसांच्या ताफ्याने परिसराचा ताबा घेतला. कॉल सेंटरमध्ये काम करणार्या तरुण-तरुणींना राहण्यासाठी मोंढा नाका परिसरात फ्लॅट, कॉल सेंटरमध्ये जाण्या-येण्यासाठी आलिशान गाड्या देण्यात आल्या. त्यांना 15 ते 50 हजारांपर्यंत मासिक वेतन आणि फसवणुकीवर किमान पाच लाखांपर्यंत इन्सेंटिव्ह दिला जायचा, अशी माहिती समोर आली आहे.




या कॉल सेंटरच्या मालकांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील एक तर दुसरा गुजरातमधील आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष कॉलिंग करणार्या 118 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व उपायुक्त प्रशांत स्वामी, उपायुक्त रत्नाकर नवले, उपायुक्त पंकज अतुलकर आणि पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी केले.
ईशान्य भारतातील तरुण-तरुणी
या कॉल सेंटरमध्ये काम करणारे बहुतांश तरुण-तरुणी ईशान्य भारतातील नागालँड, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर प्रदेश, तेलंगण, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. यातील बहुतांश जण अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन या कॉल सेंटरमध्ये काम करत होते
असा मिळवायचे अमेरिकन नागरिकांचा डेटा
अमेरिकन नागरिकांची माहिती ‘पीपल फाइंडरडॉट कॉम आणि व्हाइटपेजेस डॉट कॉम’ या वेबसाइटवरून घेतली जात होती. तसेच डार्क वेबवर बनवण्यात आलेल्या टूटानोटा डॉट कॉम हा प्रोव्हायडर टाकण्यात येत होता.
या तरुण-तरुणींना अमेरिकन क्सेंटच्या इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार संवाद साधल्याने अमेरिकी नागरिक पटकन विश्वास ठेवत होते अन् जाळ्यात अडकत होते. याशिवाय त्यांना अस्खलित इंग्रजी बोलता यावे यासाठीदेखील खास प्रशिक्षण दिले जायचे. जो सर्वाधिक वेळ संभाषण करून समोरिल व्यक्तीला गुंतवून ठेवेल त्याला सर्वाधिक इन्सेंटिव्ह मिळायचा.
व्हर्च्युअल आयडीद्वारे कॉलिंग
अमेरिकेतील थकबाकीदार नागरिकांना कॉलिंग करण्यासाठी सायबर क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामध्ये आयपी ड्रेसवरून व्हर्च्युअल आयडी तयार केला जायचा. या आयडीवरून अमेरिकेतील नागरिकांना कॉल केल्यास त्यांच्या मोबाइलवर अमेरिकेतील नंबर दिसायचे. त्यामुळे अमेरिकन नागरिक त्यावर चटकन विश्वास ठेवायचे.
डॉलरचे रुपयांत रूपांतर असे
फसवणूक झालेल्या नागरिकांकडून कूपन, व्हाऊचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये रक्कम घेतली जात होती. हे डॉलर सिंगापूर, थायलंड, कंबोडिया देशातून बिटकॉइनच्या माध्यमातून भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केले जात होते. डॉलर ते रुपयामध्ये येणारी रक्कम आरोपींच्या गुजरातमधील बँक खात्यावर वळवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.