भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा


भुसावळ (5 डिसेंबर 2025) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात मातृसंस्था हिंदी सेवा मंडळाच्या 75 वर्षपूर्ती अर्थात अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयात शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी वक्तृत्व स्पर्धा झाली.

यांची होती उपस्थिती
स्पर्धेत हिंदी सेवा मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आठवी ते बारावी कनिष्ठ गट व प्रथम वर्ष ते पदवीपर्यंत वरिष्ठ गट करण्यात आला होता. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभात सर्वप्रथम अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाच्या सचिव मधुलता शर्मा होत्या. कोषाध्यक्ष अ‍ॅड.महेश दत्तजी तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी, आय.टी.आय प्राचार्य संजय शुक्ला हे उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. विद्यार्थिनीने विद्यापीठ व स्वागत गीत प्रस्तुत केले. वकृत्व स्पर्धेचा विषय, गट अ, आतंकवाद अपराध आहे. गट ब साठी नवी शिक्षा नीती व विकसीत भारत हे ठेवण्यात आले होते. स्पर्धेत 35 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अ गटात शिफा शेख हिने प्रथम क्रमांक, शिफा बागवान हिने द्वितीय क्रमांक व तेहरी मुस्कान हिने तृतीय क्रमांक मिळवले.

ब गटात दीक्षा अरुण मोरे प्रथम तेजस्विनी गवली व राहत शेख हिने तृतीय क्रमांक मिळवला. विजेते विद्यार्थी यांना ट्रॉफी व पुरस्कार, प्रमाणपत्र महाविद्यालयातर्फे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. ऍड महेशदत्त तिवारी यांनी मुलांना आपले अनुभव सांगून प्रोत्साहन दिले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी नवीन शिक्षा प्रणाली याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली तसेच सर्व मान्यवरांचे आभारही मानले.

संचालन प्राध्यापक अनुपम शर्मा यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.शिवा खान, प्रा.समता तायडे, प्रा.घोडेकर, प्रा.डॉ.जाधव, प्रा.गुप्ता यांनी सक्रिय सहभाग घेतला. परीक्षक म्हणून प्रा.गिरीश कुलकर्णी, प्रा.विवेक मुंदडा व पांडव यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांसोबत धीरज अग्रवाल कार्यक्रमात उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !