रिक्षा अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू : भुसावळच्या मिक्सर चालकाला अटक
Three people from Jamner died in a rickshaw accident ; the mixer truck driver from Bhusawal has been arrested जळगाव (15 डिसेंबर 2025) : भरधाव मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मिक्सर वाहनचालकावर जामनेर पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात जामनेर तालुक्यातील गंगापूरी रस्त्यावर शनिवारी घडला होता.
रिक्षा अपघातात तिघे ठार
भुसावळहून जामनेरकडे येत असलेल्या प्रवासी रिक्षाला समोरून येणार्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकीसह तीन जण ठार तर पाचजण जखमी झाले. हा अपघात शनिवार, 13 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडा दरम्यान घडला. मिक्सर ट्रक (एम.एच.19 सी.एक्स.2181) या गाडीने पियाजो रिक्षा (क्रमांक एम.एच.19 व्ही.3704) ला जबरदस्त धडक दिली.


रिक्षात एकूण 8 प्रवासी होते व अपघातात सरला गोपाळ निंबाळकर (42) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (20, दोन्ही रा. चिंचखेड बुद्रुक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (32, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा मृत्यू ओढवला होता तर पाच प्रवासी जखमी झाले होते. अपघात प्रकरणी मिक्सर वाहन चालक गोपाळ राजाराम बारी (59, रा.फेकरी दीपनगर, भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.







