भुसावळातील तरुणावर उसनवार पैशांच्या वादातून हल्ला


भुसावळ (24 जून 20226) : उधारीने घेतलेले पैसे परत मागण्याच्या वादातून भुसावळातील 30 वर्षीय तरुणावर हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. ही घटना अन्सार उल्ला नगरात 22 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले भुसावळात ?
वसीम खान खलील खान (30, अन्सार उल्ला नगर, खडका रोड, भुसावळ) हे मार्केटींगचे काम करतात व त्यांनी संशयीत मुदब्बीर शेख सलीम (मिल्लतनगर, भुसावळ) यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले आहेत. हे पैसे परत मागण्यासाठी संशयीत मुदब्बीर आल्यानंतर त्यांनी अश्लील भाषेत शिविगाळ केली व उधारीची रक्कम परत न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.


तक्रारदाराने पैसे देण्यासाठी काही काळाचा अवधी मागितल्यानंतर संशयीताने सोबत आणलेल्या कुठल्यातरी लोखंडी वस्तूने तक्रारदाराच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तपास कॉन्स्टेबल दत्तात्रय कांबळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !