शेतकर्‍यांसह नागरिक सुखावले : पावसासोबतच हतनूरमधून आवर्तन सुटले : भुसावळकरांची चिंता मिटली


Farmers and citizens relieved: Water released from Hatnur alongside rainfall; concerns of Bhusawal residents eased भुसावळ (24 जून 2026) : भुसावळ शहरातील तापी नदीतील बंधार्‍याने तळ गाठल्याने शहराला दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत होता. आवर्तनाची मागणी सातत्याने केली जात असतानाच बुधवार, 24 रोजी सायंकाळी सहा वाजता चारशे क्यूसेक आवर्तन सोडण्यात आल्याने शहर व परिसराचा पाणीप्रश्न मिटला आहे. विशेष म्हणजे, बुधवारी दुपारनंतर शहर व परिसरात पावसालाही सुरूवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होवून उष्णतेने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, आवर्तनामुळे भुसावळसह वरणगाव शहर, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ मध्य रेल्वेचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


बंधार्‍याने तळ गाठल्याने दूषित पाणीपुरवठा
शहरात 12 ते 15 दिवसाआड होणार्‍या पाणीपुरवठ्याने नागरिक आधीच संतप्त असतानाच बंधार्‍यातील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत होता. शहरवासीयांना दिलासा मिळण्यासाठी पालिकेने प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती तर प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी मंत्री संजय सावकारे यांच्याकडेही आवर्तनासाठी पाठपुरावा केला होता. बुधवार, 24 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धरणातून 400 क्युसेक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. दरम्यान, यावल शहरासाठी कालव्यातून 300 क्यूसेक पाण्याचे आवर्तन बुधवारी सकाळी आठ वाजता सोडण्यात आल्याने यावलचाही पाणीप्रश्न मिटला आहे. धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजता धरणाची लेव्हल 210.170 तर स्टोरेज 202.10 व लाईव्ह स्टोरेज 20 टक्के असल्याचे सांगण्यात आले.

हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात 189 मिलीमीटर पाऊस
बुधवार, 24 जून रोजी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर मागील 24 तासात 189.6 मिलीमीट पाऊस झाल्याचे नोंदवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार देढतलाई- 3.8, टेक्सा- 28.8, एरडी- 42.8, गोपालखेडा- 29.6, लखपुरी- 26.6, लोहारा- 50.0, अकोला- 8.0 मिलीमीटर पाऊस झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !