7500 रुपयांची लाच भोवली : चाळीसगाव सामाजिक वनीकरण विभागाचा वनपाल नाशिक एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
₹7,500 Bribe Lands Forester in Trouble: Chalisgaon Social Forestry Department Official Caught by Nashik ACB भुसावळ (24 जून 2006) : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मंजूर झालेल्या साडेचार लाखांच्या निधीपैकी 50 हजारांचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती साडेसात हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगावातील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपालास नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने वनविभागातील लाचखोर हादरले आहेत. बुधवार, 24 रोजी सायंकाळी हा सापळा यशस्वी करण्यात आला. प्यारेलाल विठ्ठल महाजन (53, चाळीसगाव) असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे शिवारातील शेतात चंदनाचे वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासनामार्फत निधी मिळविण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तीन वर्षांसाठी एकूण चार लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. संबंधित कामाचे बिल सादर केल्यानंतर देयकातील 50 हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी आरोपीने बिलाच्या 15 टक्के रकमेप्रमाणे साडेसात हजारांची लाच मागितली.


तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवार, 24 जून रोजी सायंकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी प्यारेलाल विठ्ठल महाजन (53) यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात विनोद चौधरी, अनिल गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !