फैजपूरात अवैधरित्या गोवंश मांसाची विक्री : दोघांविरोधात गुन्हा
Illegal sale of beef in Faizpur: Case registered against two individuals. फैजपूर (24 जून 2026) : फैजपूर पोलीस ठाण्याची धूरा नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. दोन ठिकाणी स्वतंत्र छापेमारी करीत 80 किलो वजनाचे गोवंश जातीचे मांस जप्त करून संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संशयीतांविरोधात कारवाई
सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांनी गुप्त माहितीवरून शहरातील इस्लामपुरा भागातील सलीम खान मुसा खान कुरेशी यांचे घरास लागुन असलेल्या ओपन पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मिल्लत नगर भागात शेख साजीद शेख रहीम यांच्या घराला लागून असलेल्या कुंपणात अवैधरित्या गोवशांची कत्तल करून मांस विक्री होत असताना पथकाने छापेमारी करीत 22 हजार 300 रुपये किंमतीचे 80 किलो वजनाचे गोवंश जातीचे प्राण्यांचे मांस, तराजू काटे, मांस कापण्यासाठी लागणारे लहान-मोठे चाकू व कुर्हाडी, लाकडी कुंदे आदी मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सलीमखान मुसा खान कुरेशी (45, रा.ईस्लामपुरा, फैजपूर) व शेख साजीद शेख रहिम (46, मिल्लतनगर, फैजपूर) यांना अटक करण्यात आली. कॉन्स्टेबल राहुल काशीनाथ नावकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल बड़ग्जर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, एएसआय मोती पवार, हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, हवालदार देवेंद्र पाटील, हवालदार रवींद्र मोरे, हवालदार विकास सोनवणे, नाईक समाधान पाटील, राहुल नावकर, रुपेश पाटील, भूषण ठाकरे आदींच्या पथकाने केली.
