भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत यश


भुसावळ (15 डिसेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी संस्कृती मनोज मेढे हिने 17 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल डॉ.तालीमेरेन जूनियर्स गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप 2025-26 दिमापुर नागालँड येथे झालेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.

अंतीम सामन्यात मिळवले यश
महाराष्ट्र टीमने मिझोरम या टीम सोबत पहिली मॅच 3/3 ने टाय केली.आणि दुसरी मॅच ही मध्य प्रदेश टीम सोबत 2/0 ने बाद केली आणि तिसरी मॅच ही हिमाचल प्रदेश ला 14/0 ने बाद केले. त्यानंतर महाराष्ट्र टीम ही सेमी फायनलला पोहोचली.सेमी फायनल मध्ये पंजाब या टीमला महाराष्ट्र टीम ने 2 /0 ने बाद करुण महाराष्ट्राची टीम ही फायनलला पोहोचली. त्यानंतर महाराष्ट्र टीमही फायनल ला पोहोचून त्यांची मॅच ही उत्तर प्रदेश या टीम सोबत झाली. महाराष्ट्र टीमने उत्तर प्रदेशला 1/4 पॉईंटने हरवून महाराष्ट्र टीमने सुवर्ण पदक प्राप्त केले.



महाराष्ट्र टीम मध्ये खेळणार्‍या संस्कृती मनोज मेढे हिच्या यशामुळे ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर, संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक यांनी तिचे कौतुक केले. तिला अर्जुन सनस, अकबर खान, डॅनियल पवार, विजय संकट, आकाश परदेशी यांनी मार्गदर्शन केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !