!-- afp header code starts here -->

अजितदादांच्या निधनाने कार्यकर्त्यांची बारामतीकडे धाव ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्धवस्त झालो !


Following Ajitdada’s death, party workers rushed to Baramati ; Supriya Sule said, “We are devastated!” बारामती (28 जानेवारी 2026) : बारामती येथे विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह सहा जणांचे बुधवारी सकाळी निधन झाले. पवार कुटुंब, बारामतीकर आणि संबंध राज्यावर या घटनेने शोककळा पसरली. अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच युगेंद्र पवारांना अश्रू अनावर झाले तर सुप्रिया सुळे यांनी उद्धवस्त झाल्याची प्रतिक्रिया दिली. अजितदादांवर प्रेम करणार्‍या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या उद्धवस्त झालो
अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचे समजताच त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीहून तात्काळ बारामतीकडे रवाना झाल्या. सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एकाच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्हॉटसअप स्टेटस ठेवून आम्ही उद्धवस्त झालो आहोत, अशा भावना व्यक्त केल्या.

युगेंद्र पवारांना अश्रू अनावर
अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवारांचे पणतू युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा फोनवर बोलतानाच बांध फुटला. यापूर्वी 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती मात्र निवडणूक संपल्यानंतर पवार कुटुंबाने आम्ही सारे एकच आहोत, हा संदेश नेहमीच महाराष्ट्राला दिला होता.

असा घडला अपघात ?
अजित पवार सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीला निघाले होते. हे विमान बारामती विमानतळावर बुधवारी सकाळी 9 ते 9:15 च्या दरम्यान आले. ते उतरण्याचा प्रयत्न करत होते मात्र तांत्रिक कारणांमुळे धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीवर उतरण्याऐवजी जवळच्या शेतात कोसळले. विमानला आग लागली. काही वेळातच ते जळून खाक झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. लोकांनीही ती मृतदेह पडल्याचे पाहिले. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली. प्रशासन, आपत्कालीन सेवांनी तत्काळ धाव घेतली. हा विमान अपघात म्हणजे पायलटची चूक होती का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !