!-- afp header code starts here -->

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होण्याची अजितचीही इच्छा पूर्ण व्हावी : शरद पवार


Sharad Pawar: Ajit’s wish for the merger of both Nationalist parties should also be fulfilled. पुणे (31 जानेवारी 2026) : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे ही अजित पवारांचीही इच्छा होती व ती इच्छा पूर्ण व्हायला हवी, असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे.

अजित-शरद पवार यांची बैठक 17 जानेवारी रोजी बारामती येथे झाली. या बैठकीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू केली होती. पवार यांनी सांगितले की, विलीनीकरणाची तारीखही निश्चित झाली होती. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती पण दुर्दैवाने अजित त्याआधीच आम्हाला सोडून गेले.

आगामी काळात सर्व पक्ष एकत्र काम करतील
शरद पवारांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) नेते प्रमोद हिंदुराव म्हणाले, ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही, पण मला वाटते की येत्या काळात सर्व पक्ष एकत्र काम करतील.

अजित यांनी 17 जानेवारी रोजी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी बारामती कृषी प्रदर्शन, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबद्दल चर्चा केली. एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, विलीनीकरणावर चर्चा झाली होती. या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे. या भेटीनंतर 11 दिवसांनी अजित यांचे विमान अपघातात निधन झाले.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !