मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले : राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चा दादा भाजपशी चर्चेविना करतील का !


The Chief Minister stated clearly: Will the NCP discuss a merger with the BJP without consulting Dada (Ajit Pawar)? मुंबई (2 फेब्रुवारी 2026) : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यास भाजपचा विरोध नाही मात्र अजित पवार माझ्याशी सगळ्या मुद्यांवर बोलत होते. समजा ते अशा पद्धतीची कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ती कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींतील संघर्ष अधिक वाढला आहे.

ही पद्धत योग्य नाही
मुख्यमंत्री म्हणाले की, अजित पवार अशा प्रकारची चर्चा एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? ते तर सरकारमध्ये स्थिर होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टिम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धत योग्य नाही. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याविषयी निर्णय घेऊ.

दुसरे प्रश्न नाहीच का ?
आमदार रोहित पवारांनी अजित पवारांशी झालेल्या चर्चेचा तपशील 13 दिवसांच्या शोककाळ संपल्यावर जाहीर करणार असल्याचे सांगितले. तर एकत्र येण्याच्या मुद्याशिवाय दुसरे काही प्रश्न शिल्लक राहिले नाहीत का? असा सवाल अजित पवार गटाचे नेते, माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला.

आमच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा
पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केले की, मला राजकारण करायचं नाही, नाही तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. विलिनीकरणाचा निर्णय 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की, कोणताही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे की, आमच्या सोबतच्या पक्षांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही कालही पाळली. आजही पाळू.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !