देशातील तपास यंत्रणा लाचार : खासदार संजय राऊत
The country’s investigative system is helpless: MP Sanjay Raut मुंबई (12 फेब्रुवारी 2026) :देशातील ईडी तसेच महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणा असेल, न्यायालयीन चौकशी असेल यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ही लोकं भारत मातेला ट्रम्पकडे गहाण ठेवू शकतात ते काहीही करु शकतात. मोदी सत्तेत आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही. जे भ्रष्टनेते त्यांच्यासोबत गेले त्यांना सोडून देण्यात आले आहे. सरकार आणि तपास यंत्रणावर आमचा विश्वास नाही, असे उबाठाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तपास यंत्रणावर विश्वास नाही
संजय राऊत म्हणाले की, अहमदाबादमध्ये विमान पडले त्यांचा तपास काय झाला? पण झालं काय? अहमदाबादमध्ये विमान कसं पडलं हे सांगू शकाल? अजितदादांना घेऊन येणारं विमान सुद्धा गुजरातमधूनच आलं. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तापस यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयापासून सर्व तपास यंत्रणा आपल्या टाचेखाली आहे हे सर्व जनतेना माहिती आहे देवेंद्र फडणवीस. ज्याला धोतरं नेसता येत नाही ते आम्हाला घाबरू नका सांगणार का? तो माणूस लफंगा आहे? शिवराय, महात्मा फुलेंचा अपमान करणार्या कोशारी यांना पुरस्कार देणं ही बाळासाहेबांचे विचार नाही.

..तर चौकशीला गती मिळाली असती
संजय राऊत म्हणाले की, रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यानंतर तुम्हाला दु:ख झाले होते, त्यांचा पुतण्या सत्य आणि तथ्य दाखवतो आहे तर फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तुमचे दु:ख हे ढोंग आहे. तपास यंत्रणा यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावे. अजित पवारांच्या अपघाताचे सत्य पवार कुटुंबियांनी बाहेर काढले आहे. काल सुनेत्रा पवारांची मोदी यांच्याशी चांगली बैठक झाली आहे, त्यांनी दादांच्या अपघाताबद्दल मोदींशी चर्चा करायला हवी होती, तर तपासाला वेग आला असता. रोहित पवारांच्या प्रत्येक मुद्यावर अभ्यास झाला पाहिजे. अजित पवारांकडे भाजपच्या ज्या फाईल होत्या त्या घेण्यासाठी पूर्व विदर्भातील कोणता नेता अजित पवार यांच्याकडे आला होता का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
हे गृहमंत्र्यांचे अपयश
संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतीमध्ये तक्रारी आणि आरोप वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल राऊत यांनी केला आहे. मुंबईत चार वर्षे याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, प्रशासकाने भ्रष्टाचार केला. त्यांनी नक्कीच तपास केला पाहिजे. मुंबई सुरक्षित नसेल तर हे सरकारचे अपयश आहे. महापौरांना गृहमंत्री कोण आहेत हे माहिती पाहिजे असा टोला ही त्यांनी लगावला आहे. महिलांना सुरक्षित ठेवणे गृहमंत्र्यांचे काम महापौरांचे नाही, मुंबईच्या महापौरांनी यासाठी ठिय्या आंदोलन केले पाहिजे.






