!-- afp header code starts here -->

पत्नीचे प्रेम संबंध : नांद्रा गावातील शेतकर्‍याची आत्महत्या ; पाच आरोपींना अटक


Wife’s love affair: Farmer in Nandra village commits suicide ; Case filed against seven peopleजळगाव (15 फेब्रुवारी 2026) : पत्नीचे गावातील तरुणाशी प्रेम जुळल्यानंतर कुटूंबात तणाव वाढल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना नांद्रा, ता.जळगाव येथे घडली होती. या प्रकरणी पत्नीसह सात जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन महिलांचं तीन पुरुषांचा समावेश आहे.

प्रेम संबंधाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
सुरेश हिरामण बाविस्कर (38, रा.नांद्रे बु॥, ता.जळगाव) या तरुणाने पत्नी सोनीचे गावातीलच मोहन विलास सपकाळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून वाद होत असल्याने नांद्रा शिवारात आत्महत्या केली होती. मयत सुरेशने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपींनी त्याला उलट धमकी दिली तसेच 7 फेब्रुवारी रोजी एका लग्नसमारंभात आरोपींनी सुरेशच्या मुलाला मारहाण केली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी शेतात काम करत असताना संशयित आरोपींनी सुरेशला गाठून पत्नीबद्दल अपशब्द बोलून अश्लील शिविगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याने व सततच्या अपमानामुळे आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या सुरेशने 14 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नांद्रा शिवारात शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

या संशयीतांविरोधात गुन्हा
मृत सुरेशच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसांनी मयताची पत्नी सोनी सुरेश बाविस्कर, मोहन विलास सपकाळे, विशाल कैलास कोळी, भारती पंढरीनाथ तायडे, ईश्वर पंढरीनाथ तायडे, जया गणेश सपकाळे, गणेश विजय कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !