जळगावात गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : संशयीत एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Terror in Jalgaon caused by the threat of a country-made pistol: Suspect nabbed by MIDC police जळगाव (27 जून 2026) : गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणार्‍या एका तरुणासह त्याला कट्ट्याची विक्री करणार्‍या मुख्य सूत्रधाराच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई बुधवार, 24 जून रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

समीर खान जावेद खान (25, रा.बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने चौकशीत हा कट्टा जावेद शेख सलीम शेख (रा.दत्तनगर, मेहरुण, जळगाव) यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली असून पोलीस संशयीताचा शोध घेत आहेत.



अशी झाली कारवाई
समीर खान हा तरुण बुधवार, 24 जून रोजी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची आणि परिसरात दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि संशयित समीर खान याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा मिळून आला.
पोलिसांनी समीर खानची कसून चौकशी केली असता, त्याने हा कट्टा मेहरुणमधील दत्तनगर भागात राहणार्‍या जावेद शेख सलीम शेख याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ न गमावता तात्काळ सूत्रे हलवून संशयित विक्रेता जावेद शेख यालाही दत्तनगर परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व सहकार्‍यांनी केली. तपास एएसआय विजयसिंग पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !