विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहन चालकांनी सुरक्षेचे नियम न पाळल्यास कारवाई अटळ : भुसावळात महेश बेलदार
भुसावळ (27 जून 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शालेय परिवहन समितीची सभा शनिवार, 27 रोजी दुपारी दोन वाजता झाली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहन चालकांनी सुरक्षेचे नियम न पाळल्यास कारवाई अटळ असल्याचे यावेळी आरटीओ निरीक्षक महेश बेलदार म्हणाले. यावेळी त्यांनी सुरक्षेचे नियम सांगून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी जळगाव आरटीओ कार्यालयाचे महेश बेलदार उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, शालेय परिवहन समिती प्रमुख एम.एस.बोंडे, तसेच चालक-मालक संघटनेचे प्रमुख महेश चोपडे व सुनील नारखेडे व इतर सर्व रिक्षा व वाहन चालक, खाजगी बस चालक, तसेच शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या


वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन
महेश बेलदार यांनी परिवहनाबाबतचे नियम समजावून दिले. सर्व वाहन चालकांना शासनाचे नियम, वाहनाचा वेग, सीसीटीव्ही कॅमेरा, इन्शुरन्स, वाहन परमिट , बिल्ला परवाना आदींबाबत कायदेशीर नियम सांगून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पायी चालतांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे याविषयी उदाहरण देऊन पटवून दिले. आभार एस.पी.झांबरे यांनी मानले.
