!-- afp header code starts here -->

मळगावात बैलगाडा शर्यत गाजली : नंदकिशोर अन् बजरंग बैलजोडी ठरली यशाची मानकरी


अशोक परदेशी
भडगाव (15 फेब्रुवारी 2026) : भडगाव तालुक्यातील मळगाव येथे रमताबाबा यात्रेनिमित्त शनिवार, 14 रोजी पवन फॅन्स क्लब व ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. ही बैलगाडा शर्यत मळगाव बांबरुड रस्त्यालगत पार पडली. दुपारी 12.30 वाजता आखाडा पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन राजेंद्र परदेशी, पत्रकार अशोक परदेशी, बंडु देवरे (बांबरुड प्र.ब.), शैलेश मोरे, शाम चित्ते, ईश्वर परदेशी, बालु पाटील, प्रताप परदेशी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पवन फॅन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, पंच मंडळी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या बैलगाडा शर्यतीत जवळपास 250 बैलजोडींचा सहभाग होता.

या शर्यतीत नंदकिशोर बैल (हातले, ता.चाळीसगाव) येथील मालक हर्षल राजपूत तसेच बजरंग बैल (करगाव, ता.चाळीसगाव) येथील पंकज राठोड, निंबा राठोड हे यशाचे पहिले मानकरी ठरले. फुलंब्री जि. संभाजीनगरचा तेज्या अन अर्जुन ही बैलजोडी दुसर्‍या स्थानी यशाचे मानकरी ठरले. तेज्याचे मालक माहिरा मुलतानी, फरदीन मुलतानी पिरवाडेकर हे आहेत तर अर्जुनचे मालक भरत राजपुत, चरण राजपुत,माराया राजपुत हे मालक फुलंब्री, ता.संभाजीनगर येथील आहेत.

गणेशपूर, ता.चाळीसगाव येथील काशी अन बादल बैलजोडीनेही तिसर्‍यास्थानी यश मिळविले आहे. बाणगाव, ता.चाळीसगाव येथील कृष्णा अन शंभु या बैलजोडीनेही चौथ्या स्थानी यश मिळविले आहे.

वडाळा, ता.चाळीसगाव येथील बाजी अन वादळ या बैलजोडीनेही पाचव्या स्थानी यश मिळविले आहे. महाकाल अन शिव या बैलजोडीनेही सहाव्या स्थानी यश मिळविले आहे. या शर्यतीत सर्वच बैलजोडींनी उत्कृष्ट वेग, ताकद अन शिस्तबद्दतीत आपले कला गुण दाखवून धाव पट्टीत यश मिळवुन उपस्थितांचे मने जिंकली.

प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने सर्वच बैलजोडींचे व मालकांचे स्वागत केले होते. या शर्यतीत जळगाव, संभाजीनगर, धुळे, सातारा यासह जिल्हयातील बैलगाडे सहभागी झाले.. या ठिकाणी जणु यात्रेचे स्वरुप आल्याचे दिसुन आले.

पंच म्हणून दीपक पाटील, लखन बैरागी, धनसिंग परदेशी, चेतन पाटील, अभि परदेशी, तेजस पाटील, ऋषी परदेशी, अनिल परदेशी, किरण पाटील, निलेश राजपूत तसेच चाळीसगाव पंच कमेटीचेही अनमोल सहकार्य लाभले.

सूत्रसंचलन दीपक पाटील, लखन बैरागी, चेतन पाटील, धनसिंग परदेशी आदिंनी उत्कृटरित्या केले.

बक्षीस वितरणरणाचा कार्यक्रम सायंकाळी पार पडला. यावेळी विजयी बैलजोडी मालकांना फ्रीज, कपाट, सोफाशेट, ड्रेसींग टेबल, पंखा, टेबल फॅन असे बक्षिसे देऊन स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन राजेंद्र परदेशी, फौजी समाधान पाटील, पञ्त्रकार अशोक परदेशी, शिवसेना भिमसेनेचे अध्यक्ष शैलेश मोरे, बबलू आमले (वडाळा), ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, फौजी ग्रुप, पवन फॅन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आयोजक पवन फॅन्स क्लबच्या सर्व पदाधिकार्‍यांनी अनमोल परीश्रम घेतले. याकामी मळगाव ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थांचेही अनमोल सहकार्य लाभले. बैलगाडा शर्यतीचे गावामार्फत प्रथमच आयोजन करण्यात आले होते.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !