भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेने मुक्ताईनगर तालुक्यातील दुईची महिला ठार तर अन्य महिला गंभीर जखमी


मुक्ताईनगर (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : भरधाव आयशर वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील 44 महिला जागीच ठार झाली तर सोबतची महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात 10 रोजी सकाळी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात वाहन धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. छाया मोतीराम पाटील (44, दुई) असे मयत महिलेचे नाव आहे.

पहाटेच्या सुमारास अपघात
सूत्रांच्या माहतीनुसार, छाया पाटील (44) व शोभा कडू पाटील (56) आदी महिला पूर्णाड फाटा ते कुर्‍हा रस्त्यावरील प्राथमिक आरेाग्य केंद्राजवळील रस्त्यावरून शौचावरून परत असताना कुठल्यातरी भरधाव आयशर वाहनाने या महिलांना जबर धडक दिली. या धडकेत छाया पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर शोभा पाटील या जखमी झाल्या. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी भागवत ज्ञानेश्वर पाटील (25 मूळ रा.दुई, ह.मु.बालाजी नगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजकुमार चव्हाण करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !