श्री क्षेत्र बांबरुड प्र.ब. ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी पालखी सोहळा
दिंडीत 200 वारकरी भाविकांचा सहभाग : पत्रकार अशोक परदेशींनी घेतले पालखीचे दर्शन.
भडगाव (2 मार्च 2026) : श्री संत एकनाथ महाराज (नाथषष्टी) जल समाधी सोहळानिमित्त निर्लोभ दिंडी पालखी सोहळा श्री क्षेत्र बांबरुड प्र.ब.(पाटस्थळ) सातगाव डोंगरी ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी पालखी सोहळा भाविकांसह 27 रोजी सकाळी निघाला. हाती भगवे झेंडे, हरी मुखे नाम घेता पायी दिंडीमुळे भक्तीमय वातावरण दिसुन आले.
25 रोजी सायंकाळी पाच वाजता बांबरुड प्र.ब.संत कोडुगिरी महाराज समाधीस्थळापासून ते बांबरुड प्र. ब. जुन्या गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्राी समाधीस्थळावर किर्तनाचा कार्यक्रम झाला व याच ठिकाणी दिंडीतील भाविक मुक्कामाला होते.


26 रोजी गावातून सकाळी पायी दिंडी बांबरुड प्र. ब. येथील ब्रम्हलीन संत कोंडुगिरी महाराज यांच्या समाधीस्थळ मंदिराजवळुन निघाली. तेथून सकाळी गोंडगाव, कनाशी, निंभोरा, वडजीला मुक्काम झाला.
27 रोजी सकाळी वडजीहुन भडगाव, पाचोरा मुक्काम झाला आहे. या दिवशी भडगाव शहरात पायी दिंडी पालखी सोहळा आला असता पत्रकार अशोक परदेशी यांनी पालखीचे दर्शन घेतले. व दिंडी चालक गोसेवक हभप. ज्ञानेश्वर माऊली यांचे आशीर्वाद घेतले.
28 रोजी पाचोरा येथून सातगाव डोंगरी येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे. सातगावहून पुढे दिंडीचे प्रस्थान सुरू राहणार आहे. होती. या दिंडीचे संयोजक हभप शालिकराव पवार, गोसेवक हभप ज्ञानेश्वर माऊली सातगाव हे आहेत. या दिंडीचे हे 18 वे वर्ष आहे. या दिंडीत जवळपास 200 वारकरी भाविक सहभागी असल्याची माहिती दिंडी चालक गोसेवक हभप ज्ञानेश्वर माऊली सातगाव यांनी दिली. याकामी नवयुवक तरुण मंडळ, ग्रामस्थ बांबरुड प्र. ब, ग्रामस्थ मंडळी निमखेडी ता. सोयगाव, नवयुवक तरुण मंडळ सातगाव ता. पाचोरा यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. दिंडीतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सेवा जावळे, ता.चाळीसगाव येथील समाजसेवक भगवान परदेशी यांनी मोफत पुरविली.







