नागपूर भीषण स्फोट ; संचालकासह 21 वरिष्ठ अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नागपूर (2 फेब्रुवारी 2026) : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 रोजी सकाळी सातच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड सया बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणार्या कंपनीत हा मोठा स्फोट घडल्यानंतर 19 मजुरांचा मृत्यू ओढवला होता. य प्रकरणी एसबीएल एनर्जी लिमिटेडमधील स्फोट प्रकरणात कंपनीच्या 21 वरिष्ठ अधिकार्यांवर भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कळमेश्वर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसबीएल एनर्जी लिमिटेडचे मालक संजय चौधरी यांच्यासह इतर संचालकांसह, प्लांट हेड आणि मॅनेजरवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे नेमके प्रकरण ?
नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तपासाअंती एसबीएल एनर्जीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
नऊ संशयीतांना अटक
एसबीएल एनर्जी कंपनी चे संचालक, प्रोजेक्ट मॅनेजर, प्लांट मॅनेजर, सुपरवायझर, सेफ्टी ऑफिसर सह 21 वरिष्ठ अधिकार्यांविरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काल (1 मार्च) रात्रभरात पोलिसांनी याप्रकरणी ठोस कारवाई करत 9 जणांना अटकही केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या स्फोटातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारकडून दोन, तर राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तर राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जखमींना 50 हजारांची मदत करण्यात येईल. तर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.







