फत्तेपूर हादरले : 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार : 14 आरोपींना अटक
Fattepur Shaken: Gang-rape of 40-year-old woman; 14 accused arrested. फत्तेपूर (29 जून 2026) : 40 वर्षीय महिला परिचयातील मित्रासोबत जंगलात एकांतात बसली असताना अचानक आलेल्या 15 संशयीतांपैकी दोघांनी धमकावून महिलेवर सामूहिक अत्याचार केला तर उर्वरीत संशयीतांनी आरोपींना आवर घालण्याऐवजी घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा प्रकार एव्हढ्यावर न थांबता सोमवार, 29 रोजी एका आरोपीने घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत केला. फत्तेपूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत 15 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करीत 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
असे आहे नेमके प्रकरण ?
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव-कापूसवाडी रोडवरील ठांबरडा नाला जवळील एका निर्जन जंगल परिसरात 40 वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्र मित्र रोषण गुलशेर तडवी यांच्यासोबत बसलेली असताना अचानक या ठिकाणी मुस्लिम तडवी समाजातील 15 तरुण आले. त्यांनी दोघांना धमकावून त्यातील युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी या दोघांनी महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केला.


यावेळी उपस्थित अन्य संशयीतांना आरोपींना विरोध करण्याऐवजी आपल्या मोबाईल फोनवर या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर, त्यातील एका संशयित आरोपीने हा व्हिडिओ सोमवार, 29 रोजी सोशल मीडियावर व्हायरल केला. फत्तेपूर पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती कळताच त्यांनी तातडीने पावले उचलून 15 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला व 14 आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
