भुसावळ शहर खुनाने हादरले : 55 वर्षीय पूजार्‍याची अज्ञातांकडून हत्या


गणेश वाघ
Bhusawal city shaken by murder: 55-year-old priest killed by unknown persons भुसावळ (29 जून 2026) : भुसावळ शहराजवळील झेडटीआरआय बोगद्याजवळ 55 वर्षीय पूजार्‍याची डोक्यात काहीतरी टणक वस्तू टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, 29 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष रघुवीर मंचल (55, झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे खून झालेल्या पूजार्‍याचे नाव आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांची धाव
शहरातील आरपीडी रस्त्यावरील लष्करी डेपोपासून एक किलोमीटर अंतरावर तीन मंदिरे असून या मंदिरात संतोष मंचल हे पूजारी म्हणून काम पाहत होते. निर्जन असलेल्या या परिसरात फारसे कुणाचेही जाणे-येणे नाही तर सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या कुटूंबातील सदस्य मंदिरात गेल्यानंतर त्यांना मंचल यांचा मृतदेह पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार संदीप पालवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.



खुनाचे कारण अस्पष्ट
मंदिराच्या पूजार्‍याची नेमकी कुणी वा का हत्या केली? याचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. जळगाव येथून ठसे तज्ज्ञांसह फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !