शिंदखेडा पोलिसांची कामगिरी : शेतातील बोअरवेल केबल चोरी करणारी आरोपी जाळ्यात

1.29 लाखांचा मुद्देमाल जप्त : तीन केबल चोरीचे गुन्हे उघडकीस


Shindkheda Police Achievement: Accused behind theft of farm borewell cable apprehended शिंदखेडा (29 जून 2026) : शेतातील बोअरवेलच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत शिंदखेडा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करीत दोन सराईत आरोपींना अटक. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या चौकशीतून केबल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून या कारवाईमुळे परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तीन गुन्ह्यांची उकल
शिंदखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून 2026 रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे शिवारातील शेतातून बोअरवेलची केबल कापून चोरी करीत असताना दोन आरोपींना तक्रारदाराने ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान पोलिसांनी संशयीत मयूर भिला धनगर (24, रा.वाल्मिक नगर, शिरपूर) व राहुल संजय पारधी (20, रा.शिरपूर, जि. धुळे) यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही शिंदखेडा परिसरातील विविध शेतांमधून वीज तारा व बोअरवेलच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली.



आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली सुजुकी एक्सेस दुचाकी तसेच चोरी केलेल्या केबलसह एकूण एक लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या कबुलीजबाबावरून शिंदखेडा पोलिसांनी शिंदखेडा हद्दीतील तीन गुन्ह्यांची (गुन्हा क्र. 139/2026), (गुन्हा क्र. 149/2026) व (गुन्हा क्र. 150/2026) उकल केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मयूर भामरे, उपनिरीक्षक माया राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुलाब ठाकरे, पोलीस अंमलदार हेमंत फुलपगारे, हवालदार गणेश सोनवणे, अकील पठाण, प्रशांत पवार, रूपेश चौधरी, पुनमचंद कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनवणे यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !