भीषण अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील तिघे ठार


Three killed in horrific accident in Muktainagar taluka मालेगाव  (6 मार्च 2026) : देवदर्शन करून आपल्या मूळ गावी परतणार्‍या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील कुटूंबाच्या वाहनाला अपघात झाल्याने एकाच कुटूंबातील तिघे ठार झाले. हा अपघात मालेगाव परिसरात शुक्रवार, 6 मार्च रोजी सकाळी झाला. मृतांमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

होळीच्या सणासाठी गावी येताना झाला अपघात
सातोड येथील नाफडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी नाशिकला वास्तव्यास आहे. होळीच्या सणानिमित्त कुलदैवताचे दर्शन घेऊन ते नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे खाजगी वाहनाने येत होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालेगाव परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीतील तिघांचा जागीच प्राण गेला.



मृतक आणि जखमींची नावे
या अपघातात दीपक किशोर नाफडे 35), प्रथमेश दीपक नाफडे (4) आणि अंकिता संजय नाफडे (19) या तिघांचा मृत्यू झाला तर संजय पांडुरंग नाफडे (50), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (30) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

सातोड गावात हळहळ
घटनेची माहिती मिळताच सातोड गावचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी तात्काळ मालेगावकडे धाव घेतली.  मृतांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सातोड गावी आणण्यात येत असल्याचे समजते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !