भुसावळकरांची पाणीटंचाईतून सुटका : हतनूरच्या आवर्तनाने बंधारा ‘ओव्हर फ्लो’
Relief for Bhusawalkar’s water shortage: Dam overflows due to Hatnur’s rotation भुसावळ (7 मार्च 2026) : ऐन उन्हाळ्यात भुसावळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती होती मात्र आता हतनूर धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन तापीच्या बंधार्यात पोहोचल्याने किमान 40 दिवस तरी शहरवासीयांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत. असे असलेतरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पालिकेचा बंधारा ‘ओव्हर फ्लो’
हत्पूर भरणातून भुसावळ शहरासह रेल्वे व दोपनगर औष्णिक केंद्रासाठी सोमवार, 2 मार्चला दुसरे आवर्तन सोडण्यात आले व आवर्तनाचे पाणी शुक्रवारी पालिकेच्या बंधार्यात येताच बंधारा ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे तूर्ततरी पाण्याची टंचाई मिटली आहे. आगामी तीन दिवसांत पाणीपुरवठ्याचे रोटेशन आता सुरळीत होणार आहे.


तूर्त चिंता मिटली
भुसावळ शहराला तापी नदी पात्रातील बंधान्यातून पाणीपुरवठा होते मात्र बंधार्यात केवळ 38 ते 40 दिवसांचा साठा करता येतो. गेल्या पंधरवडधात बंधार्याची जलपातळी घसरल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत इराला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासन तसेच पालिकेने हतनूर प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली. त्यानंतर हतनूर धरणातून 12 दलघमीचे आवर्तन हजार क्यूसेस वेगाने सोडण्यात आले. हे पाणी शुक्रवारी बंधार्यात पोहोचल असून शहरवासीयांची पाण्याची चिंता तूर्त तरी मिटली आहे.







