पाच राज्यात विधानसभा निवडणूक :आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद


Assembly Elections in Five States : Election Commission’s Press Conference Today मुंबई (15 मार्च 2026) : पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी राज्यात विधानसभा निवडणूक होत असून या संदर्भात रविवार, 15 रोजी दुपारी चार वाजता निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

मे महिन्यात संपणार कार्यकाळ!
पाचही विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत आहे. 2021 मध्ये या सर्व पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. गतवेळी बंगालमध्ये आठ टप्प्यांत निवडणुका झाल्या. आसाममध्ये तीन आणि तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले.





पाचही राज्यांमध्ये एसआयआर, तामिळनाडूमध्ये सर्वाधिक नावे वगळली गेली
ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यापैकी एसआआरनंतर तामिळनाडूमधून सर्वाधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की, 27 ऑक्टोबर 2025 रोजी डखठ प्रक्रिया सुरू झाली तेव्हा राज्यात एकूण 6,41,14,587 मतदार होते. सुमारे चार महिने चाललेल्या डखठ मध्ये 74,07,207 लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यात आता 5,67,07,380 मतदार नोंदणीकृत आहेत.

तर पश्चिम बंगाल दुसर्‍या क्रमांकावर आहे, जिथे सुमारे 58 लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर केरळमध्ये 8 लाख, आसाममध्ये 2 लाख आणि पुडुचेरीमध्ये सर्वात कमी 77 हजार लोकांची नावे डखठ प्रक्रियेनंतर मतदार यादीतून वगळण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !