दिव्यांग उमेदवारांसाठी जळगावात १८ मार्च रोजी रोजगार मेळावा


जळगाव (17 मार्च 2026) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि सेंट्रल युथ फॉर जॉब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे होणार आहे. या मेळाव्यात फोकस ह्युंदाई, सॅमसंग सर्व्हिस सेंटर, मिल्कवे महा ई-सेवा केंद्र, एविडर इनोव्हेशन प्रा. लि., व्हिटामिन एम कन्सल्टंट, हिरा अॅग्रो, रँडस्टॅड इंडिया प्रा. लि., अॅमेझॉन प्रा. लि. आदी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
१० वी, १२ वी तसेच पदवीधर (B.Com, M.Com आदी) पात्रता असलेल्या इच्छुक दिव्यांग उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून संबंधित रिक्त पदांसाठी अर्ज करावा. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
मेळाव्यादरम्यान नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, मुंबई येथील अधिकारी उपस्थित राहून उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. संदीप ज्ञा. गायकवाड यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !