भुसावळातील भोळे महाविद्यालयात मिशन साहसी अभियानाचा समारोप
भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘मिशन साहसी अभियान’ या सहा दिवसीय अभियानाचा गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026 रोजी समारोप करण्यात आला. अभियानाच्या समारोपप्रसंगी युवतींच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे
डॉ.प्रिया बर्हाटे यांनी ‘युवतींचे आरोग्य : समस्या व उपाययोजना’ या विषयावर मार्गदर्शन केले. युवतींनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहणे, योग्य आहार व स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, आरोग्यविषयक समस्या वेळीच ओळखणे तसेच आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. या कार्यक्रमास 50 विद्यार्थिनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी तर युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी आभार मानले. यावेळी युवती सभा सदस्य प्रा.डॉ.अंजली पाटील, गायत्री नेमाडे व सुशिला भाटे उपस्थित होत्या. सहा दिवसीय मिशन साहसी अभियानाचा समारोप युवतींच्या आरोग्यविषयक जागृतीच्या संदेशाने करण्यात आला.




