भुसावळातील पूजा कॉम्प्लेक्स परिसरात खंडित वीजपुरवठ्याने संताप


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शहरातील पूजा कॉम्प्लेक्स परिसर पांडुरंग नाथ नगर तसेच संपूर्ण भुसावळ शहरात झिरो लोडच्या नावाखाली वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येत आहे. हा परिसर शिवाजीनगर युनिटच्या अंतर्गत येतो. पूजा कॉम्प्लेक्स परिसर तसेच पांडुरंगनाथ नगरातील सर्व वीज ग्राहक हे नियमित वीज भरणा करतात असे असून देखील वारंवार परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांना तसेच वयोवृद्धांना होणारा त्रास सोसावा लागत आहे. या संदर्भात राज्य पत्रकार संघटनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष संघरत्न सपकाळे यांच्या वतीने कार्यकारी अभियंता सोनावले यांना निवेदन देण्यात आले.

मनमानी कारभाराने संताप
महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक हा त्रस्त झाला आहे. झिरो लोड शेडिंगच्या नावाखाली ही मनमानी सुरू असून पूर्व सूचना वीज ग्राहकांना दिली जात नाही. रात्री-अपरात्री वीजपुरवठा बंद करण्यात येत असताना र्मचार्‍यांना कारण विचारल्यास त्यांच्याकडून वरूनच वीज बंद करण्यात आल्याचे उत्तर दिले जाते. मनमानी कारभार न थांबल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !