जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतन डीनपदी डॉ. मीनाक्षी गजभीये


डॉ.भास्कर खैरे यांचा अधिष्ठाता पदाचा अतिरीक्त पदभार काढला

जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ.मीनाक्षी गजभीये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान डीन तथा प्रोफेसर डॉ.भास्कर खैरे यांचा अधिष्ठाता पदाचा अतिरीक्त पदभार काढण्यात आला असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. डॉ.डॉ.खैरे यांच्याविरुद्ध वाढलेली नाराजी तसेच तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या. दरम्यान, धुळे महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !