भुसावळात धाडसी घरफोडी : तीन लाखांचा ऐवज लंपास
Audacious Burglary in Bhusawal : Valuables Worth ₹3 Lakhs Stolen भुसावळ (10 मे 2026) : शहरातील राजगौंड हाऊसिंग सोसायटी परिसराील बंद घर फोडत चोरट्यांनी दोन लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर टार्गेट
भगवानराम भाऊ दुपारे (64, रेल्वे पेन्शनर, रा. राजगौंड हाऊसिंग सोसायटी, रामदेवबाबा नगर, खडका रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार 5 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 8 मे रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.


चोरीमध्ये सुमारे एक लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे. घरफोडीनंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.