जळगाव एमआयडीसी हद्दीत घरफोडी : 65 हजारांचा ऐवज लंपास


जळगाव (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : जळगाव एमआयडीसी हद्दीतील घरात चोरट्यांनी घरफोडी करीत 65 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे घरफोडी प्रकरण
सम्राट अविनाश शर्मा (45, डी.110, एमआयडीसी, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 9 ते 16 नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी डी.110 मधील घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप, 15 हजार रुपये किंमतीची चांदीची मूर्ती, 15 हजार रुपये किंमतीची लक्ष्मीची मूर्ती, 15 हजार रुपये किंमतीची स्वामी समर्थांची मूर्ती मिळून एकूण 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. तपास हवालदार किरण चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !