मुक्ताईनगर तालुक्यात बालविवाह : पाच जणांविरोधात गुन्हा


Child Marriage in Muktainagar Taluka : Case Registered Against Five Individuals मुक्ताईनगर (11 मे 2026) : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

असे आहे प्रकरण
मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव परिसरातील मंदिरात 3 मे 2026 रोजी दुपारी सुमारे तीन वाजता हा विवाह पार पडला. अल्पवयीन मुलगी अवघे 16 वर्ष 11 महिन्यांची अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.



या प्रकरणी सुरपाबाई बाबुराव जामुनकर (65, रा.उमापूर, ता. जामोद, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिल्यानुसार मुलीचे वडील रामचंद्र बाबुराव जामुनकर, आई बबिता रामचंद्र जामुनकर तसेच अन्य संबंधितांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात झुंबरलाल हिरा धांडेकर, गजानन रमेश मांजरे आणि तुकाराम ऊर्फ मयूर पाटील यांचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सर्वांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत कलम 9, 10 आणि 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !