जळगावात 23 गुन्ह्यातील पावणेतीन कोटींचा गांजा कायदेशीर प्रक्रियेअंती नष्ट


Ganja worth ₹2.75 crore, seized in connection with 23 cases in Jalgaon, destroyed following legal procedures.  जळगाव (11 मे 2026) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये दाख2ल असलेल्या 23 गुन्ह्यांतील तब्बल दोन कोटी 72 लाख 40 हजार रुपये किंमतीचा एक हजार 362 किलो वजनाचा सुका गांजा पोलिसांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेअंती नष्ट केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

यांची होती उपस्थिती
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या जप्त अंमली पदार्थांचा आढावा घेतला.



23 गुन्ह्यातील गांजा नष्ट
संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 गुन्ह्यांमधील जप्त गांजा नष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीने प्रस्तावाची पडताळणी करून अंमली पदार्थ नाशास मान्यता दिल्यानंतर रविवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारतीच्या मागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल, याची काळजी घेत गांजाचा नाश करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले असून सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

या अधिकार्‍यांची उपस्थिती
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत पार पडली. समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच निरीक्षक वजन मापे राजेंद्र व्यवहारे यांचा समावेश होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !