यावलला ऑपरेशन वॉश आऊट : पन्नीची दारू, सट्टा जुगारांवर छापे ; चौकडी ताब्यात
‘Operation Washout’ in Yawal : Raids on Illicit Liquor and Gambling Dens; Four Individuals Detained यावल (12 मे 2026) : यावल पोलिसांच्या वतीने शहरात सोमवारी सायंकाळी ऑपरेशन वॉश आऊट राबवण्यात आले. यात बस स्थानकाच्या आवारात अवैधरित्या विक्री केली जाणारी पन्नीची दारू जप्त करण्यात आली तसेच सट्टा, जुगारावरदेखील छापा टाकण्यात आला या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे अवैधद्य धंदे चालवणार्यांचे धाबे दणाणले.
कारवाईने उडाली खळबळ
यावल पोलिसांच्या वतीने ऑपरेशन वॉश आऊट हाती घेण्यात आले. सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, सहायक फौजदा1र विजय पाचपोळे, हवालदार राजेंद्र पवार, अमित तडवीसह पथकाने बस स्थानकासमोर असलेल्या एका हॉटेलच्या आड दोघे गावठी पन्नीची दारू विक्री करीत असताना कारवाई केली. तब्बल 120 लिटर 12 हजार रुपये किंमतीची गावठी पन्नीची दारू जप्त करण्यात आली. आकाश कोळी व विजय माळी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरूध्द मुंबई दारू बंदी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. तर या कारवाईमुळे शहरात अवैद्य धंदे करणार्यांचे चांगलेचं धाबे दणाणले आहे
सट्टा-जुगारावर कारवाई
शहरातील बाबूजीपुरा भागात सट्टा जुगार खेळवत असताना सय्यद नियाज अली याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम तसेच सट्टा जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार मोहन तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील सुंदर नगरी भागात देखील जयेश बारी हा बोरावल गेट जवळील टपरीचे आडोशाला सट्टा जुगार खेळत होता. त्याच्याकडून देखील सट्टा जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. एक हजार 260 रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले तर दुसर्या कारवाईत अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार विजय पासपोळे, पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहे.

