धुळे एसीबीची मोठी कारवाई : पंचायत समितीतील लाचखोर तांत्रिक सहाय्यक सात हजारांची लाच घेताना जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (12 मे 2026) : धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक विश्वजित संजय भामरे (31, भरत नगर, नकाणे रोड, धुळे) यास सात हजारांची लाच लाच स्वीकारताच धुळे एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. हा सापळा मंगळवार, 12 रोजी सायंकाळी यशस्वी करण्यात आला. या कारवाईने धुळे पंचायत समितीतील लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार भाऊ व बहिणीच्या नावाने नंदाळे बु.॥ येथे शेतजमीन आहे. तक्रारदाराच्या बहिणीला शेतजमिनीत महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये विहीर खोदकामासाठी तीन लाख 99 हजार 610 रुपयांचा निधी मंजूर झाला होता व दोन लाख 39 हजारांचे अनुदान मिळाल्यानंत संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करत होते.







5 रोजी तक्रारदाराने तांत्रिक सहाय्यक विश्वजित भामरे यांची भेट घेतली असता विहिरीची मोजणी पुस्तिका पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली व एसीबीकडे तक्रारकरण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला व भामरे यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, सागर माळी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !