भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक
Minor Girl Assaulted in Bhadgaon Taluka; Accused Arrested भडगाव (14 मे 2026) : भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आपल्यानंतर ती गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
असे आहे प्रकरण
भडगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या पीडीतेची एका महिलेने आरोपीसोबत ओळख करून दिल्यानंतर त्याने ओळख वाढवत विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला फूस लावून वेगवेगळ्या कारणांनी भेटण्यास भाग पाडले. या काळात आरोपीने तिच्यावर महिलेच्या घरात अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर संपूर्ण घटना समोर आली.








